आयटी, फार्मा क्षेत्रांच्या जोरावर शेअर बाजाराची मुसंडी

 

स्थैर्य, मुंबई, ८: भारतीय निर्देशांक सलग सहाव्या दिवशी उच्चांकी स्थितीत पोहोचला. आजच्या व्यापारी सत्रातील वृद्धीचे नेतृत्व आयटी, फार्मा क्षेत्रांनी केले. निफ्टीने ०.८२% किंवा ९५.७५ अंकांनी वृद्धी घेतली व तो ११,८०० अंकांची पातळी ओलांडत ११,८३४ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने ३०३.७२ अंकांनी किंवा ०.७६% नी वृद्धी घेत ४०,१८२.६७ अंकांवर विश्रांती घेतली.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास १२१५ शेअर्सनी नफा कमावला, १४१९ शेअर्स घसरले तर १५९ शेअर्स स्थिर राहिले. विप्रो (७.३४%), सिपला (४.९८%), टीसीएस (३.०२%), अल्ट्राटेक सिमेंट (३.०१%) आणि इन्फोसिस (२.६२%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर गेल (३.११%), ओएनजीसी (२.७७%), आयटीसी (१.४२%), आयशर मोटर्स (१.३४%) आणि एलअँडटी (०.८८%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.

सर्व क्षेत्रांपैकी आयटी, फार्मा आणि बँकिंग स्टॉक्स हिरव्या रंगात स्थिरावले तर एनर्जी आणि एफएमसीजी स्टॉक्समध्ये विक्री दिसून आली. बीएसई मिडकॅप ०.३६% नी वधारला तर बीएसई स्मॉलकॅप ०.२१% नी घटला.

विप्रो लिमिटेड: कंपनीच्या बोर्डाने १३ ऑक्टोबर रोजी बायबॅक प्लॅनचा विचार करणार असल्याचे वृत्त दिल्यानंतर आयटी क्षेत्रातील दिग्गज विप्रो लिमिटेड कंपनीचे स्टॉक्स ७.३४% नी वाढले व त्यांनी ३५९.९० रुपयांवर व्यापार केला. फर्मची स्पर्धक कंपनी टीसीएसच्या बोर्डाने १६,००० कोटी रुपयांची बायबॅक योजना पूर्ण केल्यानंतर विप्रोने ही घोषणा केली.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड: टीसीएसने सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत प्रॉफिट आफ्टर टॅक्स (PAT) ७४७५ कोटी रुपयांचा नोंदवला. तसेच अनुक्रमे ६.७ टक्क्यांची वृद्धी दर्शवली. ऑपरेशन्समधून कंपनीच्या एकत्रित महसूलात ४.७ टक्क्यांची वाढ झाली. तिमाहीतील एकूण कराराचे मूूल्य ८.६ अब्ज डॉलर एवढे झाले. कंपनीचे शेअर मूल्य ३.०२ टक्क्यांनी वाढले व त्यांनी २,८१८.४५ रुपयांवर व्यापार केला.

कॅडिला हेल्थकेअर लि.: कॅडिला हेल्थकेअरने भारतातील पहिले प्रेशराइज्ड मीटरर्ड डोज इनहेलर लाँच केल्यानंतर कंपनीचे शेअर्स ५.४५ टक्क्यांनी वाढले व त्यांनी ४३५.३५ रुपयांवर व्यापार केला. गंभीर अडथळे निर्माण करणा-या फुप्फुसाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हे इनहेलर आणले आहे.

जीएम ब्रेवरीज लि.: जीएम ब्रेवरीज कंपनीने वार्षिक निव्वळ नफ्यात ४३.५% ची घसरण नोंदवली. तर फर्मचा महसूल ४०% नी घसरून ७२.६ कोटी रुपयांवर आला. परिणामी कंपनीचे शेअर्स ४.८३% नी घटले व त्यांनी ३८४.०० रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये खरेदी आणि डॉलरचे अवमूल्यन यामुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने सलग दुसऱ्या दिवशी चांगली कामगिरी करत ७३.२४ रुपयांचे मूल्य कमावले.

जागतिक बाजार: अमेरिकेकडून वित्तीय मदतीच्या आंशिक कराराच्या आशेने अमेरिकी बाजारपेठेला आधार मिळाला. आजच्या सत्रात अमेरिकेसह युरोपियन स्टॉक्सदेखील हिरव्या रंगात स्थिरावले. हँगसेंग वगळता सर्व प्रमुख निर्देशांकांंनी उच्चांकी स्थिती गाठली. हँगसेंग ०.२०% नी घसरली. नॅसडॅकने १.८८%ची, निक्केई २२५ ने ०.९६% ची तर एफटीएसई १०० व एफटीएसई एमआयबीने अनुक्रमे ०.४९% व ०.६७% ची वृदद्धी अनुभवली.