जिल्ह्यातील 274 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 8 बाधितांचा मृत्यु

 

स्थैर्य, सातारा दि.२२: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 274 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये
 
कोराना बाधित अहवालामध्येघेतलेले एकूण नमुने -176051

एकूण बाधित --44410 

घरी सोडण्यात आलेले --37693 

मृत्यू --1466 

उपचारार्थ रुग्ण-5251