698 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 372 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 

स्थैर्य, सातारा दि.१८: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 698 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 372 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

372 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 34, कराड येथील 10, फलटण येथील 20, कोरेगाव येथील 45, वाई येथील 21, खंडाळा येथील 20, रायगाव येथील 43, पानमळेवाडी येथील 66, महाबळेश्वर येथील 10, दहिवडी येथील 17, खावली येथे 18, पिंपोडा येथील 4 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 64 असे एकूण 372 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने – 170150

एकूण बाधित -- 43233

घरी सोडण्यात आलेले -- 36397

मृत्यू -- 1422

उपचारार्थ रुग्ण -- 5414

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya