सातारा येथील पारंगे चौकातील रुबी हॉल क्लिनिकच्या बंद ऑफिसचे कुलूप तोडून 8 लाख 35 हजारांची रोकड चोरीला

 

स्थैर्य, सातारा, दि.७: सातारा येथील पारंगे चौकातील रुबी हॉल क्लिनिकच्या बंद ऑफिसचे कुलूप तोडून 8 लाख 35 हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत माहिती अशी, सातारा येथील पारंगे चौकात रुबी हॉल क्लिनिक आहे. अज्ञात चोरट्यांनी दि. 4 रोजी रात्री 8 ते दि. 5 रोजी सकाळी 9.45च्या दरम्यान चोरट्यांनी ऑफिसचे कुलूप तोडले व आतील ड्रॉव्हर तोडून 8 लाख 35 हजार 550 रुपयांची रोकड तसेच स्वाक्षरी करण्यात आलेली बँकांचे 9 चेक चोरून नेले. याप्रकरणी व्यवस्थापक संजय लावंड यांनी सातार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास सपोनि ढेकळे करत आहेत.