20 हजार रुपये हप्ता मागितल्या प्रकरणी एकाच्या विरोधात फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

 

स्थैर्य, फलटण ता. २६: दारू पिऊन शिवीगाळ करुन शहरात एकाला तलवारीचा धाक दाखवून 20 हजार रुपये हप्ता मागितल्या प्रकरणी एकाच्या विरोधात फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन मधून मिळालेली माहिती अशी की शनिवार दि.24 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वा. पंकज अरुण आंबोले (वय 24 वर्षे) (राहणार शंकर मार्केट जवळ भैरोबा गल्ली फलटण) हे शंकर मार्केट ते ब्राह्मण गल्ली असे फोनवर चालत बोलत असताना शंकर मार्केट फलटण येथे अक्षय बाळासाहेब माने हा दारू पिऊन आला व आंबोले यांना म्हणाला की तू नेत्याचा पोरगा झाला म्हणजे तू लई भाई झाला का असे म्हणून आई – बहिणीवरून शिवीगाळ केली त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी भांडण सोडवा सोडव केल्यानंतर दोन-तीन मिनिटांनी अक्षय माने हा परत हातात तलवार घेऊन आला व फिर्यादीस उलटी तलवार करून कपाळावर मारली व म्हणाला की मला 20,000/- रुपये हप्ता दे मी कोण आहे तुला माहित आहे का असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेला आहे.

याबाबत फिर्याद पंकज अरुण आंबोले यांनी अक्षय बाळासाहेब माने (राहणार हत्तीखाना बादशाह मज्जित शेजारी फलटण) यांच्या विरोधात फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून 348/2020 भा. द. वि. कलम 387, 324, 323, 504, 506, 510 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ करत आहेत.