मनोपुरम गोल्ड लोन फायनान्सच्या  बँकेला मिलावटीचे सोने देऊन ५७ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

 

स्थैर्य, सातारा, दि.१७: येथील मनोपुरम गोल्ड लोन फायनान्सच्या बँकेला मिलावटीचे सोने देऊन ५७ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सुजित जयवंत आवारे (वय ३२, रा. सुभाष नगर कोरेगाव), योगेश उर्फ यशवंत सुर्यकांत सकपाळ (वय ३०, रा. खडकी पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या दोघांनी मनोपुरम गोल्ड फायनान्सच्या बँकेत जाऊन सोने दिले. हे सोने मिलावटी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मनोपुरमचे मॅनेजर अमोल चव्हाण (रा.गुरुवार पेठ सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
Previous Post Next Post