खंडणी मागणाऱ्या पुणे येथील तीन जणांच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 

स्थैर्य, वाई, दि.१०: रेपच्या केसमधून सुटायचे असेल तर 50 कोट रुपये दे किंवा वडिलांच्या नावाचा जमिनीचा हिस्सा नावावर करून दे, नाहीतर जिवंत सोडणार नाही, अशी मनीष हरिष मिलानी यांना धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या पुणे येथील तीन जनांच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यातील एका आरोपीचे नाव सागर सूर्यवंशी (रा.कोरेगाव पार्क पुणे)असे आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे येथील मनीष मिलानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या वडिलांनी सागर सूर्यवंशी याला कायदेशीर सल्लागार म्हणून नेमले होते.त्याचा चालक अश्फाक मेहबूब खान हा आहे.सुर्यवंशी याने वडिलांच्या नावाची जमीन परस्पर त्याच्या पत्नीच्या नावाने केल्याची बाब एप्रिल 2014 मध्ये निदर्शनास आली. त्याने 2015 मध्ये बनावट स्टँप वापरून ती जमीन सय्यद हुसेनी याच्या नावाने केल्याचे समजताच शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.त्यावरून चिडून जाऊन सागर याने पालघर, भिवंडी, पुणे, वाई, कोरेगाव या पोलीस ठाण्यात त्रयस्थ व्यक्तिमार्फत खोट्या तक्रारी केल्या आहेत.वाई पोलीस ठाण्यात 18 जानेवारी 2020 रोजी दाखल असलेल्या 376, 323, 504, 506, 34 या गुन्ह्याच्या कामी मनीष हे वाई येथे ऑगस्ट 2020 मध्ये आले होते.पोलीस चौकशी झाल्यानंतर ते शिवाजी चौकात एका ठिकाणी चहा घेत असताना अशरफ व एक महिला जवळ आली.त्यांनी सागर भाई फोनवर आहेत म्हणून फोन दिला.तुला जर रेपच्या केस मधून सुटायचे असेल तर 50 कोट रुपये दे किंवा तुझ्या वडिलांच्या नावाची जमीन आमच्या नावावर करून दे, सागर भाईच्या नादाला लागु नको जिवंत सोडणार नाही म्हणून धमकी दिली.त्यावरून वाई पोलीस ठाण्यात खंडणीची मागणी करणाऱ्या सागर सूर्यवंशी, अशरफ खान व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय शिर्के तपास करत आहेत.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya