बंधाऱ्यात पाय घसरून पडल्याने मजुराचा मृत्यू

 


स्थैर्य, वडूज, दि.१७: सातेवाडी ता खटाव येथील शंकर मोतीराम पाटोळे ( वय ४०) यांचा बंधाऱ्यात पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत वडूज पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी मयत शंकर हे गुरुवारी दि १५ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वडूज येथे मजुरीने कामास जातो म्हणून गेले होते.
 
दरम्यान फिर्यादी यांनी शंकर यास सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास फोन केला असता त्यांचा फोन लागला नाही. त्यानंतर फिर्यादी हे शोध घेण्यासाठी गेले असता मयत शंकर यांचे मित्रांकडून समजले की आम्ही पिंपळवाडी येथे कामास गेलो होतो. तेथे पाऊस असल्याने काम करता येत नसल्याने आम्ही घरी येत असताना सायंकाळी ५ च्या सुमारास वडूज येथील जगदाळे वस्ती येथील बंधाऱ्यावरून आमच्या सोबत असलेला शंकर याचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्यावेळी आम्ही त्यास वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो मिळून आला नाही. 

हा प्रकार समजल्यानंतर सातेवाडी येथील तिघे चौघानी येरळा नदीपात्रात त्याचा शोध घेतला. मात्र त्यांना ही शंकर मिळून आला नाही. यानंतर याबाबत वडूज पोलीस ठाण्यात हा प्रकार सांगितल्यानंतर दि १६ रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास गणेशवाडी गावच्या हद्दीत स्मशानभूमी जवळ येरळा नदीपात्रात त्याचा मृतदेह मिळून आला.
याबाबत महेश मोतीराम पाटोळे यांनी वडूज पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya