उपसरपंचाने सदस्याच्या डोक्यात घातली खुर्ची, ग्रामपंचायत मासिक सभेत घडला धक्कादायक प्रकार 

 


स्थैर्य, फलटण, दि.१८: फलटण तालुक्यातील चव्हाणवाडी येथील ग्रामपंचायत मधील मासिक सभेत उपसरपंच आणि सदस्यात झालेल्या वादात उपसरपंचाने सदस्याच्या डोक्यात खुर्ची घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

फलटण तालुक्यातील चव्हाणवाडी ग्रामपंचायतीची मासिक सभा सकाळी अकराच्या सुमारास सुरू असताना उपसरपंच चेतन चंद्रकांत चव्हाण वय २० याने ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सुदाम राऊत वय ४५ यांना व्हिडिओ शूटिंग करत आहे असे वाटल्याने फिर्यादी राजेंद्र राऊत यांना शिवीगाळ करुन हाताने गालावर चापटी मारल्या तसेच तेथील फायबरची खुर्ची उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केल्याची फिर्याद लोणंद पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार पाडवी हे अधिक तपास करत आहेत.
Previous Post Next Post