आरे मेट्रो कारशेड रद्द, आता कारशेड कांजुरमार्गला होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

 

स्थैर्य, दि.११: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधत आहेत. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मेट्रो-3 साठीच्या कारशेडसाठी कांजूर येथील सरकारी मालकीची जागा शून्य रुपये दराने जनहितासाठी देण्याचा सरकारचा निर्णय घेण्यात आला आहे. आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यात येणार आहे. आरेतील जंगलाची व्याप्ती आता 600 वरून 800 एकरवर होणार आहे.

कारशेडविषयी मुख्यमंत्री म्हणाले की, 'मुंबईसाठी मोठा निर्णय सांगून मी लाईव्हची सुरूवात करणार आहे. आरे कारशेडला माझा सुरुवातीपासूनच विरोध होता. मी तेव्हा मुख्यमंत्री नसतानाही याविषयी भूमिका मांडली होती. त्यामुळे आरेतील जंगलासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आरे येथील 600 एकर जमीन जंगल म्हणून घोषित करण्यात आली आहे. यासोबतच या जंगलाची व्याप्ती 800 एकर झालेली आहे. यासोबतच आरेतील कारशेड दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांविषयी म्हणाले...
शेतकऱ्यांना मी वाऱ्यावर सोडणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, ओल्या दुष्काळाची भरपाई दिली जाणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

कृषी कायदा
यासोबतच मुख्यमंत्र्यांनी कृषी कायद्याविषयीही भाष्य केले आहे. जोरजबरदस्तीने कृषी कायदा स्वीकारणार केला जाणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा स्वीकारला जाईल. केंद्राच्या कृषी विधेयकावर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya