अपघात : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात, गॅस टँकर आणि क्रेनची धडक, महामार्गावर 3 किमी वाहनांच्या रांगा

 

स्थैर्य, दि.१:  मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रोपोलीन गॅसचा टँकर आणि एका क्रेनचा भीषण अपघात झाला. रात्री 12 वाजेची दरम्यान महामार्गावरील आंबोली येथे हा अपघात झाला. भरधाव क्रेन आणि गॅस टँकरमध्ये धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की क्रेनचा चुराडा झाला आहे.

या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. अपघातामुळे गुजरातकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. तर वाहनांच्या तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या.

अपघातानंतर घटनास्थळावर वाहतूक पोलिसही तात्काळ दाखल झाले. पोलिसांकडून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले जात. आहेत ठप्प झालेली वाहतूक महामार्गावरील सर्व्हिस रोडवरुन संथगतीने सुरु केली जात आहे. तसेच या भीषण अपघताता क्रेनचा चुराडा झाला. क्रेन महामार्गावरुन हटवण्यात येत आहे.

प्रोपोलिन गॅस टँकर क्र. जी. जे. 06 ए. झेड. 6989 गुजरातकडे जात होते. याच वेळी टँकरने आंबोली ब्रिजवर क्रेनला मागून जोरदार धडक दिली. यामुळे वाहणांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच रस्ताही ब्लॉक झाल्याचे पाहायला मिळाले. सुदैवाने अपघातामध्ये कोणताही जीवितहानी झालेली नाही.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya