अभिनेत्री गीतांजली कांबळी यांचे निधन

 

स्थैर्य, मुंबई, दि.२४: ‘सही रे सही’फेम मालवणी नाट्य अभिनेत्री गीतांजली लवराज कांबळी यांचे शनिवारी निधन झाले. त्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर मुंबईत चर्नीरोड येथील सैफी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अनिल संगरिया हे उपचार करीत होते. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

गीतांजली कांबळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील मूळ रहिवासी. मात्र त्या व्यवसायासाठी मुंबई येथे राहत असत. ‘सही रे सही’ या नाटकात अभिनेते भरत जाधव यांच्या बरोबर गीतांजली कांबळी यांनी केलेला अभिनय आजही प्रेक्षकांच्या नजरेसमोर आहे. त्यांची झी वाहिनी वरील ‘कुंकू’ मालिकाही गाजली होती. त्यांनी बकुळा नामदेव घोटाळे, टाटा बिर्ला आणि लैला व गलगले निघाले, या सिनेमांमध्ये काम केले. तसेच मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या वस्त्रहरण नाटकात त्यांनी केलेल्या कामाला नाट्यरसिक दाद देत असत. गीतांजली यांनी ५० पेक्षा जास्त व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर पती लवराज कांबळी यांच्या नाटकांमध्ये त्यांनी अनेक भूमिका साकारल्या होत्या. गीतांजली यांच्या जीवनावर बायको खंबीर नवरो गंभीर मालवणी नाटक लवराज यांनी निर्मित केले आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya