7 महीन्यानंतर 21 ऑक्टोबरपासून महिलांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी, रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

 


स्थैर्य, मुंबई, दि.२१: नवरात्रीदरम्यान मुंबईतील महिलांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. येत्या 21 ऑक्टोबरपासून सकाळी 11 वाजेपासून मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये महिलांना प्रवास करता येणार आहे. परंतू, महिलांना सकाळी 11 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते रात्रीपर्यंत प्रवास करता येईल. कोरोनामुळे लोकल ट्रेन 22 मार्चपासून बंद केल्या होत्या. जुलैअखेर सुरू झालेल्या ट्रेनमध्ये फक्त महत्वाच्या खात्यातील लोकांना प्रवासाची परवानगी देण्यात आली होती.

सब-अर्बन ट्रेन्समध्ये महिलांना प्रवास करता येईल, ही माहिती स्वतः रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली. गोयल म्हणाले,'आम्ही आधीपासूनच यासाठी तयार होतो. महाराष्ट्र सरकारकडून पत्र मिळाल्यानंरच आम्ही महिलांना प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.' मुंबईत एसी लोकल सर्विसेदेखील सुरू झाली आहे. तर, मोनोरेल सेवा 18 ऑक्टोबर आणि मेट्रो 19 ऑक्टोबरपासून सुरू झाल्या.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya