सातारच्या पोलिस अधीक्षक पदी अजयकुमार बन्सल

 

स्थैर्य, फलटण, दि.७: सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली ही सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी करण्यात आलेली आहे. तर साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदी अजयकुमार बन्सल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबतचे आदेश नुकताच जारी करण्यात आलेला आहे.