अमेरिकन कवयित्री लुईस ग्लूकयांना साहित्यातील ‘नोबेल’

 

                                       

स्थैर्य, दि.९: अमेरिकन कवयित्री लुईस ग्लूक यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्वीडीश अ‍ॅकेडमीने या पुरस्काराची घोषणा केली आहे. लुईस यांच्या अद्वितीय काव्य रचनेसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात येत असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने जाहीर केले आहे.

लुईस ग्लूक या येल विद्यापीठात इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत. ७७ वर्षांच्या लुईस ग्लूक यांना याआधीदेखील अमेरिकेत साहित्यासाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लुईस यांना १९९३ मध्ये साहित्य विभागात पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मागील वर्षी २०१९ मध्ये ऑस्ट्रियाचे वंशाचे लेखक पीटर हँडका यांनी साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. नाविन्यपूर्ण लेखन आमि भाषेतील नवीन प्रयोगाची दखल घेत त्यांना हा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१९०१ मध्ये सुरू झालेल्या नोबेल पुरस्काराच्या ११९ वर्षाच्या इतिहासात दोन वेळेस साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार स्थगित करण्यात आला आहे. दुस-या महायुद्धा दरम्यान १९४३ मध्ये पहिल्यांदा पुरस्काराला स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर २०१८ मध्ये स्वीडीश अ‍ॅकेडमीच्या परीक्षक मंडळाचे सदस्य कॅटरीना यांचे पती आणि फ्रान्सचे छायाचित्रकार जेन क्लोड अरनॉल्ट यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्यावेळी हा पुरस्कार स्थगित करण्यात आला होता.