युवा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या युवांनी माहिती सादर करण्याचे आवाहन

 

स्थैर्य, सातारा दि.७: राज्याचे युवा धोरण मसुदा 2012 नुसार सातारा जिल्ह्यामध्ये युवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवांचे कार्य अधिकाधिक प्रकाशात आणण्याकरीता त्यांना रेडिओ एमएफ द्वारे, सह्याद्री वाहीनीद्वारा मुलाखतीतुन प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

तरी युवा क्षेत्रात युवांशी निगडीत केलेले कार्य, समाज उपयोगी केले कार्य, संकटसमयी केलेल्या उपाययोजना, बेटी पढाव, बेटी बचाव, कारोना काळात Fronr warrior म्हणून तसेच इतर मार्गाने केले कार्य, आरोग्यासंदर्भात केलेले कार्य, शिक्षण क्षेत्राशी निगडीत केले कार्य, सामाजिक क्षेत्राविषयी केलेले कार्य इ. अनुषंगिक कार्यालय नावलौकीक मिळविलेल्या युवांची त्यांनी गत पाच वर्षात केलेल्या ठळक व उल्लेखनिय कार्यासह संपूर्ण माहिती वर्तमानपत्र कात्राणासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, युवराज नाईक यांनी केले आहे.