पाचवड फाटा येथे बेवारस मृतदेह आढळला

 

स्थैर्य, कराड, दि.१७: नारायणवाडी ता. कराड गावचे हद्दीत पाचवड फाटा येथे कराड ते कोल्हापूर महामार्गावरील पुलाखालील बोगद्यात एक अनोळखी पुरूष मृत अवस्थेत आढळून आला. याबाबतची खबर एकाने ग्रामीण पोलिसात दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नारायणवाडी ता. कराड गावचे हद्दीत पाचवड फाटा येथे कराड ते कोल्हापूर महामार्गावरील पुलाखालील बोगद्यात कराड बाजूकडील भितीलगत पादचारी मार्गावर 2 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 5.45 वाजणेच्या सुमारास अंदाजे वय 45 वर्षीय एक अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला. त्याचे अंगात फिक्कट दुधी रंगाचा फूल बाह्यांचा शर्ट व राखाडी रंगाची पँट आहे. सदर मृत पुरूषाच्या हाताचे पोटरीवर बदामाचे चित्र गोंदलेले असून त्यामध्ये इंग्रजीत एन अक्षर गोंदलेले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Previous Post Next Post