महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती जिल्हा बँकेत संपन्न

 

स्थैर्य, सातारा, दि.३: राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांची जयंती शुक्रवार दिनांक ०२/१०/२०२० रोजी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यालयए नवीन प्रशासकीय इमारत येथे सकाळी ९.०० वाजतां संपन्न झाली

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ण् राजेंद्र सरकाळे म्हणालेए महात्मा गांधीनी अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संपूर्ण जगाला प्रेरित केलेण् अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना त्यांनी आपले जीवन समर्पित केलेण् त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी फार मोठे योगदान दिलेण् गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केलाए स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले

लाल बहादूर शास्त्री यांचेविषयी बोलताना ते म्हणालेए भारतीय राजकारणात ज्यांना मानाचा मुजरा करावा असे थोर देशभक्त म्हणजे लालबहादुर शास्त्रीण् शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होतेण् लाल बहादूर शास्त्री यांनी आनंद गुजरात येथील अमूल मॉडेलचा इतर ठिकाणी प्रसार करण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची स्थापना केलीण् स्वातंत्र्याचे रक्षण आणि लोकांचे पोषण यांचे अजोड रहस्य पटविण्यासाठी ष्जय जवान जय किसानष् हा मंत्र शास्त्रीजींनी राष्ट्राला दिला.

बॅंकेबाबत बोलताना डॉण् राजेंद्र सरकाळे म्हणालेए सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ग्रामीण भागातील तळागाळातील सर्वसामान्य शेतकरी सभासदांपर्यंत पोहोचली असून जिल्हयामध्ये ३२० शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक विविध प्रकारच्या सेवा देत आहेण् बँकेचे ग्राहकांना युपीआय सुविधा उपलब्धकरून दिली असून सर्व प्रकारचे डिजीटल व्यवहार करता येणार आहेतण् ग्राहकांना फोन बिल भरणेए लाईट बिल भरणेए ई.कॉमर्स इत्यादि सर्व व्यवहार घरबसल्या काही क्षणात करता येणार आहेतण् गुगल पेए फोनपेएपेटीएमए अॅमेझोन  या प्रकारचे अॅप्लीकेशनद्वारे मोठया प्रमाणात जलद डिजीटल व्यवहार करता येतीलण् कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत सुचविलेल्या उपाययोजनाची बँक काटेकोरपणे अंमलबजावणी करत असून बँकेच्या वतीने जिल्ह्यातील गरजू कुटुंबाना उदरनिर्वाहासाठी जीवनावश्यक अन्नधान्याचे कीटसाठी रक्कम रुण् १ कोटी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसही रक्कम रुण् १ कोटीची मदत केली असून या व्यतिरिक्त बँकेने  माण् संचालक मंडळ सदस्यांचा सभाभत्ता व बँक अधिकारीध्सेवक यांचे १ दिवसाचे वेतन अशी एकूण रक्कम रुण् १६  लाखाची मदत मा ण्मुख्यमंत्री सहाय्यता निधीस करणेत आली.

या प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ण् राजेंद्र सरकाळेए सरव्यवस्थापक श्री ण्राजीव गाढवेए श्री ण् राजेंद्र भिलारे  यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले व हार घालून विनम्र आदरांजली वाहिलीण् यावेळी बँकेचे  विविध विभागांचे व्यवस्थापकए उपव्यवस्थापक तसेच अधिक्षकए अधिकारी व सेवकवर्ग यांनी ही महात्मा गांधी यांचे प्रतिमेस फुले वाहून आदरांजली वाहिली.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya