जिल्ह्यातील शाळांना युवा संसद कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

 

स्थैर्य, सातारा दि.७: जिल्ह्यातील शाळांधील इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांमध्ये संसदीय लोशहीची मुळे रुजविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त बनविण्यासाठी युवा संसद कार्यक्र केंद्र शासनाच्या संसदीय कार्य मंत्रालयाद्वारे आयाजित केला जातो. या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता www.nyps.mpa.gov.in या वेब पोर्टलवर दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत नोंदणी करावी. 

सातारा जिल्ह्यातील संबंधित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी इयत्ता 9 वी ते 12 वी च्या युवक-युवतींना या संसद कार्यक्रमात सदभागी होण्यासाठी नोंदणी करण्याबाबत सुचित करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, युवराज नाईक यांनी केले आहे. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल sataradso@gmail.com या कार्यालयाच्या ईमेलवर करावा असेही आवाहन श्री नाईक यांनी संबंधित शाळांना केले आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya