शनिनगर येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन; नगरसेवक व प्रशासनाची त्वरित ॲक्शन




स्थैर्य, फलटण :
फलटण शहरातील बाणगंगा नदी शेजारील शनिनगर येथील अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या भागास नगरसेवक श्री.किशोरसिंह नाईक निंबाळकर (भैया) व नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी त्वरित भेट दिली. फलटण नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने पुरग्रस्त भागात वास्तव्यास असणाऱ्या सर्व नागरिकांना शंकर मार्केट, फलटण येथील व्यंकटेश विद्यालय (फलटण नगरपरिषदेच्या रुग्णालया शेजारी) येथे सुरक्षित स्थळी प्रशासनाच्या वतीने राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले, नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने सर्व मदत नागरिकांना करण्यात येत आहे व यापुढेही लागणारी सर्व मदत प्रशासन करेल अशी खात्री नगरसेवक श्री.किशोरसिंह नाईक निंबाळकर (भैया) व नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी यावेळी दिली.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya