फलटण एस टी आगार व्यवस्थापक पदी नंदकुमार धुमाळ यांची नियुक्ती

आगार व्यवस्थापक नंदकुमार धुमाळ यांचे स्वागत करताना प्रा. शिवलाल गावडे.

स्थैर्य, फलटण दि.३०: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.) फलटण आगारातील आगार व्यवस्थापक रिक्त पदावर महामंडळाच्या सातारा, बारामती, वाई आगारात यापूर्वी काम केलेले, एस. टी. प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले नंदकुमार धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रभारी आगार व्यवस्थापक व फलटण आगाराचे यंत्रशाळा प्रमुख राहुल कुंभार यांच्या कडून नंदकुमार धुमाळ यांनी आगार व्यवस्थापक पदाची जबाबदारी स्विकारली असून कामकाजास सुरुवात केली आहे.

प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रा. शिवलाल गावडे यांनी नवनियुक्त आगार व्यवस्थापक नंदकुमार धुमाळ यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन प्रवासी संघटनेच्यावतीने स्वागत केले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya