अर्णब गोस्वामीमाला मुंबई पोलिसांकडून समन; 10 लाखांच्या बाँडसह हजर व्हावे लागेल, पालघर मॉब लिंचिंगवरून दंगल भडकवल्याचा आरोप

 


स्थैर्य, मुंबई, दि.१४: मुंबईतील वरळी विभागातील एसीपीने रिपब्लिक टीव्ही संपादक अर्णब गोस्वामीला सीआरपीसीच्या कलम 108 ((1) (अ) अंतर्गत नोटीस पाठवून 16 ऑक्टोबरला चौकशीसाठी समन्स बजावला आहे. लॉकडाऊन दरम्यान वांद्रे स्थानकाबाहेर जमलेली गर्दी आणि पालघर लिंचिंग प्रकरणाविषयी केलेल्या रिपोर्टिंगविषयी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांचा असा आरोप आहे की त्यांच्या 'पूछता है भारत' या कार्यक्रमात अर्णब भावना भडकावणाऱ्या गोष्टी बोलतात. यामुळे जातीय तणाव पसरतो. यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाऊ नये का?

108 (1) (अ) हे सेक्शन चॅप्टर प्रोसिडिंगशी संबंधीत आहे. चॅप्टर प्रोसिडिंगमध्ये एसीपी रँकच्या अधिकाऱ्याला विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणजेच मॅजिस्ट्रेटचे अधिकार मिळालेले असतात.

लॉकडाउनमुळे दंगल झाली नाही - पोलिस

पोलिसांचा आरोप आहे की, अर्णब पालघरमधील संतांची हत्या आणि वांद्रेमध्ये जमा झालेल्या गर्दीविषयी आपल्या शोमध्ये धार्मिक भावना भडकवणारे भाष्य केले. दोन्ही कार्यक्रमांदरम्यान लॉकडाउन असल्याने दंगल झाली नाही. अर्णब व्यतिरिक्त मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही चॅनलचे अजून एक पत्रकार प्रदीप भंडारी यांनाही काही दिवसांपूर्वी खारच्या एका केसमध्ये समन्स बजावला होता. या नोटीसचा बनावट टीआरपीशी काहीही संबंध नाही.

10 लाखांचा बाँड भरावा लागेल

नोटीसमध्ये म्हटले आहे की, अर्णब यापुढे कोणतेही धार्मिक भावना भडकावण्याचे काम करणार नाहीत. यामुळे त्यांनी 16 ऑक्टोबरला एसीपींसमोर हजर होऊन 10 लाखांचा हा बाँड भरावा.

टीआरपी केसमध्ये रिपब्लिक केसचे दोन कर्मचाऱ्यांनाही समन्स

रिपब्लिक टीव्हीचे नाव बनावट टीआरपी प्रकरणी पुढे आले आहे. या प्रकरणी क्राइम इंटेलिजेंस युनिट तपास करत आहे. आज चॅनलसंबंधित अजून दोन लोक निरंजन नारायण स्वामी आणि अभिषेक कपूर यांना समन्स बजावण्यात आला आहे. दोघांना दुपारी 12 वाजता मुंबई पोलिस मुख्यालयात तपास टीमसमोर हजर व्हायचे आहे. यापूर्वी मुंबई क्राइम ब्रांच टीम मंगळवारी BARC च्या परेल येथील ऑफिसमध्ये पोहोचली आणि टीआरपी कशी मॉनिटर केली जाते याची पडताळणी केली.

रिपब्लिक चॅनलवर काही दिवसांपूर्वी हंसा कंपनीचा एक रिपोर्ट दाखवण्यात आला होता. त्या रिपोर्टच्या क्रेडिबिलिटीच्या तपासासाठीही मुंबई क्राइम ब्रांचने आपला तपास सुरू केला आहे. समन्समध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिपब्लिक टीव्हीवर हंसा कंपनीचा 10 ऑक्टोबरला रिपोर्ट दाखवण्याचा उल्लेख आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya