राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष पदी सौ. सुजाता गायकवाड यांची निवड

 

स्थैर्य, फलटण दि. २१: अ. भा. राष्ट्रीय काँग्रेस फलटण तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुजाता सुनिल गायकवाड, रा. तावडी, ता. फलटण यांची नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित बैठकीत सौ. सुजाता गायकवाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, त्यानंतर जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सौ. रजनीताई पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. धनश्री महाडिक, जिल्हा समन्वयक महेंद्र सुर्यवंशी बेडके वगैरेंनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी पंकज पवार, शंकरराव लोखंडे, सुनील गायकवाड (पाटील), अशोक शिंदे, शरद सोनवणे यांच्यासह महिला आघाडीच्या जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.