भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्या नेतृत्वाखाली पोवई नाका, शिवतीर्थ या ठिकाणी परिपत्रक फाडून आंदोलन

 

स्थैर्य, सातारा, दि.७: पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सर्वसामान्य शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी कृषी सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करून घेतले. त्यावर राष्ट्रपती यांची सही झाली. त्याचे कायद्यात रूपांतर होईल, परंतु हा कायदा महाराष्ट्रात लागू होऊ नये यासाठी महाराष्ट्रातल्या तिघाडी सरकारने परिपत्रक काढले आहे. सर्वसामान्य शेतकर्‍यांना होणार्‍या फायद्यापासून त्यांना दूर नेणारे हे परिपत्रक असल्याचा आरोप करत भाजपाने महाराष्ट्र शासनाचा निषेध करून संपूर्ण राज्यात निषेध आंदोलन केले. भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्या नेतृत्वाखाली पोवई नाका, शिवतीर्थ या ठिकाणी परिपत्रक फाडून आंदोलन करण्यात आले. 


यावेळी विकास गोसावी म्हणाले, नुकतेच लोकसभेत आणि राज्य सभेत मंजूर करण्यात आलेली शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक, शेतमाल हमीभाव व शेती सेवा करार (सक्षमीकरण आणि संरक्षण) विधेयक आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) अशी तीन कृषी सुधारणा विधेयके म्हणजे शेतकर्‍यांना समृद्ध करण्यासाठीच्या दिशेने टाकलेले क्रांतिकारी पाऊल आहे. नव्या विधेयकात अन्नदात्या शेतकर्‍याला अनेक बंधनातून मुक्त केले असून त्यांना आपला शेतमाल विकण्यास अधिक स्वातंत्र्य व पर्याय उपलब्ध असतील. ही विधेयके शेतकर्‍यांसाठी कवच असणार आहेत. नव्या कृषी सुधारणा विधेयकाचा शेतकर्‍यांना समृद्ध करण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या तीन कृषी सुधारणा विधेयकाच्यामुळे शेतकरी आत्मनिर्भर आणि संपन्न होणार आहे. आपला शेतीमाल बाजारपेठेत विकायचा की एपीएमसीमध्ये विकायचा हा निर्णय शेतकर्‍यांच्या हातात असणार आहे. पंतप्रधान यांनी कृषी बजेट1लाख34हजार कोटी रुपयांचे केले आहे. किसान सन्मान निीध योजना अंतर्गत 92हजार कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत. आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत कृषी क्षेत्रासाठी एक लाख कोटी रुपयांची घोषणा केली आहे. नव्या कृषी सुधारणा विधेयकाच्या निर्णयामुळे शेती क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक येण्यास मदत होणार आहे. परंतु, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष हे शेतकर्‍यांना भडकवण्याचे काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट केले आहे की देशातीलएमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किमतीची व्यवस्था पहिल्या प्रमाणेच चालू राहील आणि काही धान्याची आधारभूत किंमत वाढवण्यात आली आहे, तरीही विरोधी पक्ष राजकारण करत आहेत. 


काँग्रेस सुरुवातीपासून देशातील शेतकर्‍यांना कायद्याच्या नावाखाली अनेक बंधनांमध्ये अडकवून ठेवत आली आहे. आजपर्यंत काँग्रेसने देशातील शेतकर्‍यांच्या हिताला जपणारा कोणताही निर्णय घेतला नाही आणि आज जेव्हा मोदी सरकार शेतीविषयी कायद्यामध्ये सुधारणा करून भारतीय कृषी क्षेत्रामध्ये बदल घडवून आणून बळीराजाची परिस्थिती सुधारण्यासाठी कार्यरत आहे त्या वेळेस काँग्रेस देशातील शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. 2013 मध्ये स्वतः राहुल गांधींनी असे सांगितले की काँग्रेसचे शासन असणार्‍या बारा राज्यांमध्ये फळे व भाज्या एपीएमसी अधीनियमामध्ये समाविष्ट करून घेऊ नये आणि तीच काँग्रेस आज एपीएमसी अधिनियमामध्ये केल्या जाणार्‍या बदलाला विरोध करीत आहे.


मोदी सरकार देशातील शेतकर्‍यांना सशक्त करण्यासाठी पावले उचलत आहे त्यावेळेला काँग्रेस अतिशय घाणेरडे राजकारण करून शेतकर्‍यांना भटकविण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस स्वतः एपीएमसी अधिनियम रद्द करण्याच्या विषयी आग्रही होता. काँग्रेसने आपल्या घोषणापत्रात कृषी सर्व सुधारणा विषयी लिहिले आहे. पण प्रत्यक्ष संसदेत कृषी सुधारणा बिलाला विरोध करून काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी आपले खरे रूप शेतकर्‍यांना दाखवले आहे.


विरोधी पक्ष खोटे सांगून सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते ह ेशेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन या कृषी सुधारणा कायद्यातील तरतुदी आणि त्यांचे शेतकर्‍यांना होणारे फायदे, शेतकरी बांधवाना समजावून सांगणार आहेत, असेही गोसावी म्हणाले.
आंदोलनात जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, भरत मुळे, औद्योगिक आघाडी प्रदेश कार्यकरिणी सदस्य अमोल सणस, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत खामकर, मनोज कलापट, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, सातारा ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र इंगळे, सरचिटणीस गणेश पालखे, जिल्हा चिटणीस सुनील जाधव, अनुसुचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कांबळे, वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजक डॉ. उत्कर्ष रेपाळ, औद्योगिक आघाडी जिल्हा संयोजक निलेश शहा, व्यापारी आघाडी जिल्हा संयोजक डॉ. सचिन साळुंखे, सहसंयोजक प्रशांत जोशी, आरोग्य सेवा आघाडी जिल्हा संयोजक विवेक कदम, सातारा शहर उपाध्यक्षा मनीषा पांडे, डॉ. अजय साठे, चिटणीस वैशाली टंकसाळे, नितीन जाधव, रवी आपटे, नजमा बागवान, संतोष प्रभुणे, लक्ष्मण चव्हाण, जिल्हा कार्यकरिणी सदस्य सुनिशा शहा, अनु. जाती मोर्चा शहराध्यक्ष संदीप वायदंडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम बोराटे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष रीना भणगे, वैद्यकीय आघाडी शहर संयोजक डॉ. वीरेंद्र घड्याळे, औद्योगिक आघाडी शहर संयोजक रोहित साने, व्यापारी आघाडी शहर संयोजक लक्ष्मण पटेल, सांस्कृतिक आघाडी शहर अध्यक्ष कैलास मोहिते, सोशल मीडिया शहर अध्यक्ष कृणाल मोरे, माजी शहराध्यक्ष सुनील काळेकर, अमोल कांबळे, तालुका उपाध्यक्ष नितीन कदम, किशोर गालफाडे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya