राज्यभरात आज भाजपचे मंदिर उघडा आंदोलन, विविध शहरांमध्ये भाजप नेत्यांचे मंदिरासमोर आंदोलन सुरू

 


स्थैर्य, दि.१३: ज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र असे असले तरीही हळुहळू लॉकडाऊनचे सर्व नियम शिथील करण्यात येत आहेत. अनलॉकमध्ये अनेक गोष्टींना परवानगी मिळाली आहे. हॉटेलसह सर्वच व्यवहाय अटी-शर्थींवर सुरू करण्यात आले आहे. मात्र अद्याप धार्मिक स्थळे खुली करण्यास सरकारने परवानगी दिलेली नाही. यासाठी भाजपने मंदिर उघडा हे राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे.

आज राज्यातील विविध शहर आणि जिल्ह्यांमधील प्रमुख मंदिरांसमोर भाजप नेते, कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिरासमोरही भाजप नेत्यांनी घंटानाद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार आणि नगरसेवकांचाही सहभाग आहे. यासोबतच पुण्यामध्ये तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेरही वाद्यांचा गजर करत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे.

तर सांगलीमध्येही गणपती मंदिरासमोर टाळ-मृदंग वाजवून आंदोनलान करण्यात आले. कोल्हापुरात शेष नारायण मंदिराबाहेर निदर्शने करण्यात आली. हॉटेल, बार, मॉल सुरु केले असले तरी मंदिर बंद ठेवल्याच्या निषेधार्थ भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यासोबतच सोलापुरातही मल्लिकार्जुन मंदिराजवळ भाजपने आंदोलन केले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya