वावरहिरेत आरोग्य सर्वेक्षणास  सुरुवात; राष्ट्रीय सेवा योजना व नेहरु युवा स्वंयसेवकाची  आरोग्य पथकास मदत

 

स्थैर्य, वावरहिरे, दि.१: दिवसेंदिवस शहरीभागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे.राज्यात 'माझे गाव माझी जबाबदारी ' कोविडमुक्त महाराष्ट्र ही मोहिम राबविली जात आहे. ग्रामीण भागातही आरोग्य विभागामार्फत ही मोहिम प्रभावीपणे राबवली जात आहे.कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी डाॅक्टर,पोलिस,आरोग्य यंञणा,आशा कर्मचारी दिवसराञ काम करत आहेत.वावरहिर्‍यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत ही मोहिम प्रभावीपणे राबविली जात असुन या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी तसेच आजाराची साखळी तोडण्यासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची आरोग्य तपासणी मोहिम हाती घेतली असुन गावातील प्रत्येक कुटुंबातील नागरिकांची आरोग्य तपासणीला सुरुवात झाली आहे.यामध्ये आरोग्य सर्वेक्षण करण्यास सामाजिक जबाबदारी म्हणुन निस्वार्थीपणे सेवा देण्यास राष्ट्रीय सेवा योजना, नेहरु युवा मंडळातील स्वयंसेवक मदत करु लागलेत. आरोग्य सर्वेक्षण करण्यास ग्रामीण भागात आरोग्य विभागाकडे असणारे अपुरे संख्खाबळ यामुळे आरोग्यपथकातील कर्मचारी यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. त्यामुळे या मोहिमेसाठी स्वयंसेवक म्हणुन राष्ट्रीय सेवा योजना,नेहरु युवा मंडळाचे हात पुढे सरसावलेत.हे स्वयंसेवक आरोग्य पथकातील कर्मचार्‍याबरोबर प्रत्येक घरात पोहचुन नागरिकांच्या शरिराचे तापमान आणि प्राणवायुची तपासणी करत असुन यामध्ये प्रत्येक नागरिकांचे स्क्रिनिंग केले जात आहे. त्याचबरोबर मास्क ,सुरक्षित अंतर निर्जुंकीकरण तसेच वैयक्तिक,कुटुंबिक व सार्वजनिक जीवनशैलीत बदल करण्याबाबत योग्य मार्गदर्शन करित आहेत.त्यामुळे या स्वयंसेवकामुळे आरोग्य पथकातील कर्मचार्‍यास पडणारा ताण कमी होण्यास मदत होत आहे.
Previous Post Next Post