भारती ओंबासे यांना टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड जाहीर

 

स्थैर्य, दहिवडी, दि.१३: सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरावस्ती (टाकेवाडी)ही शाळा अनफिट फाॅर लेडीज असुन मॅडमची या शाळेवर नियुक्ती झाल्यापासून त्यांची विद्यार्थ्यांसाठी असणारी धडपड सतत विविध नवोपक्रमातून पाहायला मिळत असते.दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्व-अनुभवातून शिक्षण या नवोपक्रमाची निवड यंदाचा राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2020 चा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार जाहीर झाला आहे.

स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन,महाराष्ट्र (SIR FOUNDATION) महाराष्ट्र राज्य हे देशातील नवोपक्रमशील शिक्षकांचे एक अग्रगण्य नेटवर्क आहे.शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून सन 2006 पासून हे सर फाऊंडेशन कार्यरत आहे.

यंदा ' राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2020 ' घेण्यात आली होती.याचा निकाल जाहीर झाला, असून राज्यभरातील 105 शिक्षकांना त्यांनी शालेय स्तरावर केलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व शैक्षणिक प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची (नवोपक्रमाची ) निवड करण्यात आलेली आहे.
दुर्गम भागातील शाळा मिळुनही डगमगुन न जाता ते स्वत:साठी मिळालेले एक वरदान आहे असं मानुन ते सतत शैक्षणिक कार्य करीत आहेत.कोरोनाने सर्व जगाला स्तब्ध केले पण तो ओंबासे मॅडम यांच्या शैक्षणिक कार्याला थांबवू शकला नाही.अशा या उपक्रमशील,गुणी शिक्षिकेच्या शैक्षणिक कार्याची दखल सर फाऊंडेशन यांनी घेतली व त्यांना जो राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya