राष्ट्रीय स्वराज्य सेनेच्या राज्य सचिव पदी भूषण देसाई यांनी निवड

भूषण देसाई यांना नियुक्तीपत्र देताना श्रीहरी बागल व मान्यवर (छाया : समीर तांबोळी)


स्थैर्य, कातरखटाव, दि. ३० : दातेवाडी (ता. खटाव ) येथील सामाजिक कार्यकर्ते भूषण युवराज  देसाई यांची  राष्ट्रीय स्वराज्य सेनेच्या  राज्य सचिव  पदी निवड करण्यात आली.


कराड येथें संघटनेचे राष्ट्रीय  अध्यक्ष श्रीहरी बागल  याच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष-समीर सावंत, प्रदेशाध्यक्ष संदीप पवार ,चंद्रकांत डांगे आदींसह  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


संघटनेतील वरिष्ठांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांस राज्यपातळीवर काम करण्याची  दिलेल्या संधीचे सोने करत लवकरच राज्यभर दौरा करून संघटनेची पाळे मुळे घट्ट करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.


त्यांचे शिवाजी मोरे,  तुकाराम  निकम, शंकर  मोरे, तात्यासो निकम, दादा मोहिते,नथु पाटील,अशोक देसाई आदींसह  ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya