अॅपलला मोठे नुकसान:आयफोन 12 लॉन्चिंगपूर्वी कंपनीचे शेअर 4% कोसळले, कंपनीचे व्हॅल्यूएशन 6 लाख कोटी रुपयांनी कमी झाले

 

स्थैर्य, दि.१५: अॅपलने मंगळवारी आपला पहिला 5G आयफोन लॉन्च केला. या इवेंटच्या ठीक आधी अमेरिकन शेअर बाजारात कंपनीचे शेअर 4% कोसळले. यामुळे कंपनीचे व्हॅल्यूएशन 81 बिलियन डॉलर (5.94 लाख कोटी रुपये) नी कमी झाले. परंतू, बाजार बंद होईपर्यंत शेअरने थोडी रिकव्हरी केली.

अॅपलच्या शेअरमध्ये मोठी कपात

या इव्हेंटपूर्वी शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी कंपनीचे मोठ्याप्रमाणात शेअर्स विकले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इव्हेंटपूर्वी अॅपलचे शेअर मंगळवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजेपर्यंत सर्वात कमी 119.65 डॉलर प्रती शेअरवर आले होते. यामुळे कंपनीला एकूण 81 बिलियन डॉलरचे नुकसान झाले. परंतू, 3:35 वाजेपर्यंत शेअर्स 121.97 डॉलर प्रती शेअरवर आले होते. अखेर अमेरिकन बाजार नॅस्डॅकमध्ये अॅपलचे शेअर 121.10 प्रती शेअरवर बंद झाले.

आयफोन 12 ची लॉन्चिंग

अॅपलने आपल्या आयफोन 12 सीरीजला लॉन्च केले आहे. कंपनीने मंगळवारी रात्री कॅलिफोर्नियाच्या क्यूपर्टिनोमधील अॅपल हेडक्वार्टरमध्ये झालेल्या 'हायस्पीड' इव्हेंटमध्ये आयफोन 12, आयफोन 12 मिनी, आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्स लॉन्च केले. इव्हेंटमध्ये कंपनीने स्मार्ट होम पॉड स्पीकरदेखील लॉन्च केले. कंपनीचे म्हणने आहे की, आयफोन 12 मिनी जगातील सर्वात पातळ आणि हलका 5G स्मार्टफोन आहे. अॅडवांस बुकिंग 23 ऑक्टोबरपासून सुरू होईल.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya