बिहारमध्ये शिवसेनेच्या ‘वाघा’ला ‘बिस्कीट’!

 

स्थैर्य, पाटणा, दि.११: बिहार निवडणुकीत एनडीएचे माजी सहयोगी शिवसेना देखील 50 जागांवर लढणार आहे. मात्र पार्टी यंदा आपलं आरक्षित चिन्ह धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार नाहीत. निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला बिस्कीट निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाकडून जारी केलेल्या पत्रात दिल्यानुसार निवडणूक चिन्ह ऑर्डर, 1968 च्या परिच्छेद 13 अंतर्गत शिवसेनेला बिहारच्या 50 जागांसाठी मोफत चिन्हांच्या सूचीतील ‘बिस्किट’ निवडणूक चिन्ह मिळालं आहे.

धनुष्णबाण चिन्ह नसल्यामुळे निवडणुकीसाठी पक्षाचा उत्साह कमी झाला आहे. शिवसेनेच्या स्थानिक युनिटच्या आग्रहामुळे पार्टीने 50 जागांवर उमेदवार जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणा-या शिवसेना पक्षाला निवडणूक आयोगाने बिहारसाठी बिस्किट हे निवडणूक चिन्ह दिले आहे. ज्यावर शिवसेनेने आक्षेप नोंदवला आहे. बिहार निवडणुकीत शिवसेना 50 उमेदवार रिंगणात उभे करीत आहे. शिवसेनेने धनुष्य-बाणाऐवजी ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलिंडर किंवा बॅट या चिन्हांची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र ही तिन्ही चिन्हे न देता आयोगाने बिस्किट हे चिन्ह शिवसेनेला दिले आहे. यानंतर शिवसेनेने या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला आहे.

बिहारमध्ये सत्ताधारी दल जेडीयूने आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीतच शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे निवडणूक चिन्ह परत घेतले होते. शिवसेना आणि जेएमएमचं निवडणूक चिन्ह धनुष्य बाण आहे तर जेडीयूचे चिन्ह बाण आहे.
Previous Post Next Post