खेडमध्ये घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीस 

 


स्थैर्य, सातारा, दि. ९: खेड, ता. सातारा येथील जयमल्हार सोसायटीतील बंद फोडून 65 हजारांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी जावयावर गुन्हा दाखल झाला आहे. राहूल रमेश खलाटे रा. लाटे, ता. बारामती असे संशयीताचे नाव आहे. याबाबत सौ. हर्षा हरी नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, दि. 1 डिसेंबर 2019 च्या सुमारास राहूल खलाटे याने संध्याकाळी पावणे दहाच्या सुमारास बंद घराची कडी खोलून घरात प्रवेश केला. त्यानंतर किचनमधील लोखंडी कपाट उचकटून आतील रोकड व दागिने व दोन गॅस सिलिंडरय याची चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी हवालदार जाधव तपास करत आहेत.