अडचणीतही हप्ते फेडणाऱ्या कर्जदारांना येत्या 5 नोव्हेंबरपर्यंत मिळणार कॅशबॅक; मोरॅटोरियम न घेणाऱ्यांनाही दिला सरकारने दिलासा

 

स्थैर्य, दि.२६: कोरोनाकाळात सरकारने कर्जदारांना दिवाळी भेट दिली आहे. याचा फायदा मोरॅटोरियमचा लाभ घेणाऱ्यांसह अडचणीच्या काळातही नियमित मासिक हप्ते भरणाऱ्यांना मिळणार आहे. ज्यांनी मोरॅटोरियम घेतला त्यांना चक्रवाढ व्याज लागणार नाही. ज्यांनी नियमित हप्ते फेडले त्यांना ५ नोव्हेंबरपर्यंत कॅशबॅक मिळेल. मोरॅटोरियम घेतल्यावर जेवढे चक्रवाढ व्याज द्यावे लागले असते तेवढी रक्कम कॅशबॅक म्हणून मिळणार आहे. चक्रवाढ व्याजात सूट देण्यासंबंधी योजना सरकारने स्पष्ट करावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. यानंतर अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी रात्री हे निर्देश दिले.

सर्व सरकारी, खासगी, सहकारी, ग्रामीण बँका आणि एनबीएफसींकडून कर्ज घेणाऱ्या व्यक्तींना हाेणार फायदा...

> सरकार कॅशबॅक का देत आहे ?

नियमित कर्जाचे हप्ते भरणारा कर्जदारांचा गट मोरॅटोरियमवरील व्याज माफ करण्याच्या याेजनेमुळे नाराज झाला हाेता. त्यांच्यावर अन्याय झाला आहे असे या गटाला वाटू नये म्हणून सरकार कॅशबॅक देत आहे. कारण हप्ता न भरणाऱ्यांचे व्याज माफ हाेत आहे. त्यामुळे हप्ते भरणाऱ्यांना कॅशबॅक मिळेल.

> कॅशबॅकचा लाभ कसा मिळेल?

२ काेटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या ८ प्रकारच्या कर्जावर, पण खाते २९ फेब्रुवारी २०२० राेजी प्रमाणित (डिफाॅल्ट वा एनपीए श्रेणीत नकाे) असणे गरजेचे आहे.

> ज्यांनी आधी मोरॅटोरियम घेतले आणि नंतर घेतले नाही, त्यांनाही कॅशबॅक मिळेल का ?

हाे. अशा कर्जदारांसाठी दुसऱ्या टप्प्यात मोरॅटोरियम न घेणाऱ्यांना जून ते ऑगस्टपर्यंत या तीन महिन्यांसाठी कॅशबॅक मिळेल. चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याजातील फरका इतके हे कॅशबॅक असेल. उर्वरित तीन महिन्यांसाठी व्याजावर व्याज मिळणार नाही.

> कॅशबॅक मिळवण्यासाठी काय करावे ?

बहुतांश बँका आणि कर्ज देणाऱ्या संस्थांकडे कर्जदारांच्या बँक खात्याचा पूर्ण तपशील असताे. जर कर्जदाराला तपशीलाबाबत काही अडचण असेल तर कर्ज देणारी संस्था स्वत: ग्राहकांशी संपर्क साधेल. आता बँकाही यासंदर्भात औपचारिक घोषणा करतील.

> कोण्त्या बँकांकडून घेतलेली कर्ज या कक्षेत येतील ?

कर्ज देणाऱ्या सर्व संस्था. यात सर्व सार्वजनिक आणि खासगी बँका, बँकेतर वित्तीय संस्था (एनबीएफसी), गृहवित्त कंपन्या, सहकारी बँका, विभागीय ग्रामीण बँक, अखिल भारतीय िवत्तीय संस्था आणि राष्ट्रीय गृहनिर्माण बँका.

> काेणत्या प्रकारची कर्जे सवलतीच्या कक्षेत येतील?

एमएसएमई कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, कन्झ्युमर ड्युरेबल कर्ज, वाहन कर्ज, व्यावसायिकांची वैयक्तिक कर्जे, कन्झम्प्शन कर्ज आणि क्रेडिट कार्डाची थकबाकी या कक्षेत येतील. देशात असे एकूण १० काेटींपेक्षा जास्त कर्जदार आहेत. बँकांच्या मते यापैकी केवळ १० टक्क्यांनी मोरॅटोरियमचा लाभ घेतला आहे. म्हणजे ७ काेटी लाेकांना कॅशबॅक मिळेल, तर १ काेटी लाेेकांना व्याजावर व्याज द्यावे लागणार नाही.

> यादरम्यान एखाद्याचे खाते बंद झाले तर?

१ मार्च २०२० पासून खाते बंद हाेणाऱ्या तारखेपर्यंतचे व्याज खात्यात जमा करण्यात येईल.