लाळ खुरकत रोगाच्या समुळ उच्चाटनासाठी गायवर्ग व म्हैसवर्ग जनावरांना टॅगिंगसह लसीकरण करावे - जिल्हाधिकारी शेखर सिंह

 


स्थैर्य, सातारा दि.१२: लाळ खुरकत रोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पशुपालकांनी त्यांच्याकडील सर्व (गायवर्ग व म्हैसवर्ग) नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधून टॅगिंगसह लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

येथील पशुसंवर्धन विभागात लाळ खुरकरत लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमाचे उद्धाटन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. मिलिंद मोरे, सहायक पशुधन विकास अधिकारी श्री. शिंदे आदी उपस्थित होते.

पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यात राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम या महत्वकांक्षी योजनेंतर्गत पशुधनातील लाळ खुरकत रोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी लसीकरण कार्यक्रमाचा लाभ घेऊन लाळ खुरकत रोगाचे समुळ उच्चाटन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya