चंद्रकांत कोठावळे यांचे मुख्याधिकार्‍यांच्या दालनासमोर उपोषण

 

स्थैर्य, सातारा, दि.१६: शनिवार पेठेतील रहिवाशी चंद्रकांत कोंडिराम कोठावळे यांनी गुरुवारी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. कोठावळे यांच्या खाजगी जागेत अतिक्रमण झाल्याच्या निषेधार्थ हे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

शनिवार पेठ सर्वे क्रं 81 येथे चंद्रकांत कोठावळे यांच्या राहत्या जागेत त्यांचेच चुलत बंधू शेखर कोठावळे यांनी त्यांच्या घराचे विनापरवाना बांधकाम केले असून त्याचे अतिक्रमण आपल्या जागेत असल्याची चंद्रकांत कोठावळे यांची तक्रार आहे. अतिक्रमण करणारे हे बडया नगरसेवकाचे सहकारी असून त्यांनी यंत्रणेवर दबाव आणून बांधकाम पाडण्याची कोणतीही कारवाई केली नाही. यामध्ये तत्कालीन मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याकडे तक्रार करूनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. शहर विकास विभागाचे भाग निरीक्षक गो. रा. मोहिते यांनी सुद्धा 52-53च्या नोटीसा पाठवून कागदी घोडे नाचवले अशी तक्रार कोठावळे यांनी करत चंद्रकांत कोठावळे यांनी गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या दालना बाहेर ठिय्या दिला. तक्रारीच्या सुनावणीसाठी मुख्याधिकारी उपलब्ध झाले नसल्याचे तक्रारदारांनी सांगितले. याप्रकरणी बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा चंद्रकांत कोठावळे यांनी दिला आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya