चौधरवाडी ता. फलटण येथील दत्तनगर भागात खुनाच्या गुन्ह्या प्रकरणी चौघांना अटक

 स्थैर्य, फलटण, दि.१०: चौधरवाडी ता. फलटण येथील दत्तनगर भागात बेकायदा जमाव जमवून मागील केस काढून घेण्याच्या कारणावरून तलवार व चाकूच्या साह्याने आठ जणांनी मिळून एकाचा खून करून, कुटुंबातील इतर तिघांना गंभीर जखमी केले आहे या गुन्ह्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दत्तनगर, चौधरवाडी ता. फलटण येथे बिलटया नामदेव शिंदे, कुणाल बिलटया शिंदे ,रोशन एडिशन भोसले तिन्ही रा. कापशी ता. फलटण रेबन्या शिवा काळे ,चैत्या रेबन्या काळे दोन्हि रा. घाडगेवाडी( ता. फलटण) ,विष्णू अशोक भोसले, परश्या अशोक भोसले , रोहित आशा भोसले सर्व रा. महादेवनगर, सस्तेवाडी (ता. फलटण )हे संगनमत करून बेकायदेशीर जमाव जमवून, फिर्यादी पकुर्डी टरंग्या भोसले यांच्या घराकडे पळत आले, त्यावेळी फिर्यादीचे मालकांनी, तुम्ही का पळता? असे विचारले असता, फिर्यादी चे मालक यांना बिलटया शिंदे याने तलवारीने मारहाण केली व म्हणाला, तुम्हाला केस काढून घ्या किती वेळा सांगितले, असे म्हणून फिर्यादी पकुर्डी यांच्या डोक्यात चैत्या याने तलवारीने मारहाण केली असून मुस्कान हिला कुणाल शिंदे याने तलवारीने व परशा भोसले याने चाकूने मारहाण केली. फिर्यादीचा मुलगा प्रभु टरंग्या भोसले यांच्या गळ्यावर रोशन भोसले याने चाकूने वार केला व इतर इसमानी जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली त्यातच प्रभु टरंग्या भोसले गंभीर जखमी होऊन, मयत झालेला असून कुटुंबातील पकुर्डी रंग्या भोसले, टरंग्या आंबू भोसले, मुस्कान प्रभू भोसले हे गंभीर जखमी झाले असल्याची फिर्याद पकुर्डी टरंग्या भोसले यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

या फिर्यादीवरून वरील आठ जणांच्याविरुद्ध खून करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे असा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीकारी तानाजी बरडे यांनी भेट दिली आहे. बिलटया नामदेव शिंदे, कुणाल बिलटया शिंदे, रेबन्या शिवा काळे, चैत्या रेबन्या काळे या आरोपींना पहाटे कापशी येथुन ताब्यात घेतले असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिली आहे
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya