रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

 


स्थैर्य, मुंबई दि. ४: शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या गावखेड्यात नेणाऱ्या, गरीब, वंचित, दुर्बल, बहुजन कुटुंबांतील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘रयत शिक्षण संस्थे’चा आज स्थापना दिवस. कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांनी लावलेल्या ‘रयत शिक्षण संस्थे’चा आज वटवृक्ष झाला आहे. संस्थेच्या गेल्या शंभर वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत अमूल्य योगदान देणारे संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, शिक्षक बांधव, आजी-माजी विद्यार्थी, पालक आणि हितचिंतकांना ‘रयत शिक्षण संस्थे’च्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 

कर्मवीर अण्णा आणि रयतमाऊलींना विनम्र अभिवादन.
Previous Post Next Post