दिवंगत कोविड योद्धा उषा पुंड यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

 


स्थैर्य, अमरावती, दि. ३ : कोरोना साथीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अविरत योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे योगदान अतुलनीय आहे. रामा येथील अंगणवाडी सेविका दिवंगत उषा पुंड या साथीच्या काळात अखेरपर्यंत कार्यरत राहिल्या. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शासनाकडून या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्यात येईल व मीही स्वत:  एक कुटुंबीय म्हणून या सर्वांच्या पाठीशी आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज रामा येथे सांगितले.


 

भातकुली येथील रामा येथील अंगणवाडी सेविका उषा मधुकरराव पुंड या कोरोना संकटकाळात कार्यरत असताना त्यांचे निधन झाले. महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज रामा येथे भेट देऊन पुंड कुटुंबियांचे सांत्वन केले. जि. प. चे महिला व बालविकास अधिकारी प्रशांत थोरात यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.


पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, कोरोना संकटकाळात अंगणवाडी सेविका, आशा सेविका आपल्या जीवाची पर्वा न करता उपाययोजनांसाठी अविरत योगदान देत आहेत.  या कार्यात आपली सेवा देत असताना दुर्देवाने उषा पुंड यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल.


यावेळी पालकमंत्र्यांनी श्रीमती पुंड यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले व दिलासा दिला.Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya