चुकीच्या पद्धतीने मतदारसंघ पुनर्रचना झाल्याने लोकप्रतिनिधींना विकास कामांसाठी फारच तोकडानिधी -उदयनराजे

 

स्थैर्य, वाई, दि.२३: चुकीच्या पद्धतीने मतदारसंघ पुनर्रचना झाल्याने मतदारसंघाचे आकारमान मोठे झाल्याने खासदार आणि आमदारांचा निधी हा फारच तोकडा पडतो आहे. त्यामुळे महानगरातील लोकप्रतिनिधींचा निधी कमी करून तो इतरत्र वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

वाई पालिकेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उदयनराजेंनी वाईला बैठक घेतली यावेळी ते बोलत होते यावेळी नगराध्यक्ष प्रतिभा शिंदे मुख्याधिकारी विद्या पोळ नगरसेविका रुपाली वनारसे विकास शिंदे.ऍड दत्ता बनकर आदी उपस्थित होते.

मतदारसंघ पुनर्रचनेत मध्ये मतदारांच्या हिताचा विचार करण्यात आलेला नाही तर राजकीय सोयीच्या दृष्टीने पुनर्रचना करण्यात आली.त्यामुळे मतदारांचे फार मोठे नुकसान झाले. चुकीच्या पद्धतीने मतदारसंघ तयार केल्यामुळे लोकप्रतिनिधींना मिळणारा निधी व मतदार संघाची मागणी यामध्ये फार मोठा फरक पडत आहे. लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि खासदारांना पाच कोटी रुपये आणि विधानसभा मतदारसंघात तीन तालुके येतात व आमदारांना दोन कोटी रुपये विकासकामांसाठी येतात. मात्र मतदारसंघाची मागणी मोठी असल्यामुळे निधी अपुरा पडत असल्याची तक्रार खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. मुंबई पुणे दिल्ली बेंगलोर आमदाबाद सारख्या महानगरांमध्ये मोठ्या मोठ्या महापालिका असतात, त्यांचा स्वतःचा निधी व तेथील नगरसेवकांचा निधीही मोठा असतो तर ग्रामीण भागामध्ये मतदारसंघ मोठे आणि निधी तोकडा पडत असल्याने विकास कामे करता येत नाहीत . यासाठी महानगरांमधील खासदार ,आमदार निधी कमी करून तो देशाच्या ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींचा निधी वाढविल्यास ग्रामीण भागातील अडचणी सोडविता येतील.

हल्ली लोकांना खासदार आमदार कोण आहे त्यापेक्षा विकास महत्त्वाचा आहे. जर विकासच झाला नाही तर सब कुछ झुट आहे. त्यामुळे संबंधितांनी याचा योग्य तो विचार करावा असे आवाहन त्यांनी केले. सातारा शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे, त्यामानाने वाई शहरात विकासकामे कमी असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवकांनी व नगराध्यक्षांनी आपआपल्यातील मतभेद बाजूला ठेवून आमदार खासदार कोण आहे याकडे लक्ष न देता शहराच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. निवडून आलेले नगरसेवकांनाही मतदारांना उत्तरे द्यायची असतात मुळे प्रशासनाने दुजा भाव न करता सर्वांच्या विकासाला कामांना प्राधान्य द्यायला हवे .राज्य व केंद्र सरकारकडे जे विषय प्रलंबित आहेत त्याची यादी करून ते ताबडतोबीने माझ्याकडे पोचवा मी ते काम मार्गी लावतो. यावेळी अजित वनारसे, विजय ढेकाणे, तुषार चक्के, पालिका निरीक्षक नारायण गोसावी,सचिन झेंडे आदी उपस्थित होते.