पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये कोरोना रोधक यंत्रणा

हुतात्मा  सहकार समूहाच्या कार्यालयांमध्ये  'कोरोना किलर" उपकरण उद्घाटन 

स्थैर्य, पुणे, दि २२: जागतिक पातळीवर विशेष महत्व प्राप्त झालेल्या आयोनायझेशन या शास्त्रशुद्ध पद्धतीवर संशोधित "कोरोना किलर"हे मशीन देशभर मान्यताप्राप्त होत असताना आता पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील हुतात्मा सहकार ,उद्योग समूहाच्या कार्यालयांमध्ये ही इलेक्ट्रोनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे . वाळवा येथे बसविण्यात आलेल्या कोरोना रोधक यंत्रणेचे उद्घाटन हुतात्मा सहकार समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी यांच्या हस्ते करण्यात आले . 

या मशीनचे संशोधन केलेल्या इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स् या कंपनीचे संस्थापक, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर भाऊसाहेब जंजिरे व सहकाऱ्यांनी कोरोना किलर या मशीनचे सादरीकरण केले. कोरोना व्हायरसला ही मशीन कशा पद्धतीने निष्प्रभ करते याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती दिली. त्यानंतर हे मशीन बसविण्यात आले.

जंजिरे यांच्या समवेत प्रख्यात कायदे तज्ञ व लिमका बुक पारितोषिक विजेते, गिनीज बुक ने ज्यांच्या कामाची दखल घेतलेले ॲड विकास बा.पाटील शिरगांवकर , संजय पवार (नाना) हे उपस्थित होते .

यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक संस्था, साखर आयुक्तालय, शासकीय कार्यालये, देवस्थाने आणि निवासाच्या ठिकाणीही हे मशीन यापूर्वीच या संस्थेने बसविले आहे. 

'कोरोना अद्याप गेलेला नाही . सर्वानीच आपली काळजी घेणे गरजेचे आहे .अशा वेळी कोरोना किलर सारखी हाताळण्यास सोपी आणि प्रभावी उपकरणे संशोधित केली आहेत ,ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आपल्या कर्मचारी आणि सहकाऱ्यांना सुरक्षितपणे काम करता येणे ,यासाठी आम्ही प्राधान्य दिलेले आहे. आमच्या सहकार समूहात सर्वत्र ही यंत्रणा बसवली जाणार आहे ',असे प्रतिपादन वैभव नायकवडी यांनी यावेळी बोलताना केले. 

भाऊसाहेब जंजिरे म्हणाले ,'कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण मास्क लावणे, आसपासच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करणे हे उपाय करतो.परंत, असंख्य वस्तूंचे निर्जंतुकीकरण मात्र करू शकत नाही. नेमक्या याच अडचणीवर मात करुन आपले घर किंवा कामाचे ठिकाण कोरोना व्हायरसमुक्त करण्याची क्षमता असलेले तंत्र व मशीन इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक भाऊसाहेब जंजिरे यांनी संशोधित केले. आय. सी. एम.आर. (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) एन. आय. व्ही. (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) तसेच महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने ह्या मशीनची कार्यक्षमता प्रमाणित केली आहे. 

निवासस्थानापासून ते सर्व व्यवसायाच्या ठिकाणी हे मशीन बसविता येते. ज्या ठिकाणी हे मशीन बसविण्यात येते तेथील थोडी हवा ही मशीन घेते आणि त्या हवेचे आयोनायझेशन करून पुन्हा त्या भागातील संपूर्ण हवेत सोडते. ज्या ज्या ठिकाणी ही हवा पोहोचते तेथे हे आयान पोहचतात व कोरोना व्हायरस आणि इतर विषाणू तसेच अपायकारक सूक्ष्मजीव नष्ट व निष्प्रभ होतात, असे भाऊसाहेब जंजिरे यांनी सांगीतले

कोरोना किलर ' हे फक्त विजेवर चालणारे आणि साबण किंवा सॅनिटायझर न लागणारे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे . ते कोणत्याही बंद परिसरात वापरता येते . घर ,हॉस्पिटल ,शाळा ,हॉस्पिटल ,गाड्या ,विमान, प्रयोगशाळा ,क्वारंटाईन सेंटर ,कारखाने ,मंदिरे अशा कोणत्याही ठिकाण ते वापरता येते . रुग्णाचे मास्क ,हातमोजे ,बेडशीट आणि इतर वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यास देखील हे उपकरण उपयोगी ठरते. 

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील ,उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबार दालनातही हे मशीन बसविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अनेक संस्था, साखर आयुक्तालय, शासकीय कार्यालये, देवस्थाने आणि निवासाच्या ठिकाणीही हे मशीन यापूर्वीच या संस्थेने बसविले आहे,उपमुख्य मंत्री अजित पवार,उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनाही या संशोधनाचे सादरीकरण करण्यात आलेले आहे तसेच अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते या उपकरणाचे मुंबई येथे लोकार्पण करण्यात आले,अशी माहिती यावेळी देण्यात आली . 
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya