केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण, ट्विटरवरुन दिली माहिती

 स्थैर्य, दि.२९: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विटरवरुन याची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीले की, 'एखादी घोषणा करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, त्यामुळे मी सोप्या पद्धतीने सांगते - मला कोरोनाची लागण झाली असून, माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली चाचणी करुन घ्यावी.'

स्मृती इराणीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रसाद, नितीन गडकरी, कृष्णपाल गुर्जर, श्रीपद नाईक, अर्जुन राम मेघवाल, गर्जेंद्र सिंह शेखावत यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी मंत्र्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya