पंतप्रधान मोदींबाबत अवमानकारक मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा

 

स्थैर्य, सातारा, दि.२२: सोशल मिडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन इथापे असे असे संबंधिताचे नाव आहे. 

याबाबत माहिती अशी, फेसबुक सोशल मिडीयावर सचिन इथापे या फेसबुक अकौंट धारकाने महाराष्ट्राचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अश्‍लिल आणि बदनामीकारक मजकुर प्रसारित करून त्यांची जनमाणसात व सोशल मिडीयावर प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भाजपाचे उपाध्यक्ष राहूल शिवनामे यांनी फिर्याद दिल्याप्रकरणी सचिन इथापे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोनि मांजरे तपास करत आहेत.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya