फौजीच्या पत्नीस अश्‍लिल मेसेज पाठवल्याप्रकरणी गुन्हा

 

स्थैर्य, सातारा, दि.१: लष्करी जवानाच्या पत्नीस अश्‍लिल मेसेज पाठवून विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असून त्या व्यक्तीच्या दोन्ही मोबाईल नंबरवरून पोलिस शोध घेत आहेत. 

याबाबत माहिती अशी, संबंधित विवाहितेचा पती लष्करी सेवेत आहे. संबंधित महिलेला अनोळखी इसम मोबाईलवरून संपर्क करून अश्‍लिल मेसेज पाठवत होता. ‘एका फौजीच्या पत्नीचे मन मी समजू शकतो, तुला काय हवे आहे, काय नको, मी हवी ती मदत करीन. माझ्यापासून तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही सुंदर आहात, तरुण आहात, तुमच्याही काही अशा इच्छा असतील. हजबंड घरी नसल्यावर कधी पूर्ण होणार का? तुम्ही असेच आयुष्यभर तडफडत राहणार’ अशा आशयाचे मनात लज्जा उत्पन्न करणारे मेसेज पाठवून वारंवार संपर्क करण्याचा तो प्रयत्न करत होता. याप्रकरणी विवाहितेने याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya