कच्चे तेल: बाजारातील कोंडी

स्थैर्य, दि.२६:  ब्रेंट ($३९-$ ४३/बीबीएल) आणि डब्ल्यूटीआय ($३६-$ ४१बीबीएल) तेलाचे दर ८ सप्टेंबरपासून तेलाचे दर ५ डॉलरच्या श्रेणीत आहेत. कोणतेही स्पष्ट किंवा निर्णायक ट्रेंड नाहीत, त्यामुळे जागतिक स्थितीत पुढे काय होणार, ही चिंता गुंतवणूकदारांसमोर आहे. तेल बाजारावर परिणाम करणारे घटक अनेक आहेत. यात चिनी तेलाची साठ्यांमध्ये आयात, तेल बाजारावर संतुलन साधण्यासाठी ओपेक आणि सदस्यांची कारवाई, लिबियातील तेल उत्पादनास सुरुवात, कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत नव्याने वाढ होत असल्याने निर्माण झालेल्या चिंता आदी बाबींचा समावेश आहे. तेलबाजारातील हे घटक आणि सध्याची गती हेच या स्थितीचे प्रमुख कारक असून तेलाचे भविष्यातील दर ठरवण्यासही ते कारणीभूत ठरणार आहेत.

तेल बाजारावर संतुलन राखण्यासाठी ओपेकचे प्रयत्न: तेलाच्या बाजारावर संतुलन मिळवण्यासाठी जे करण्याची गरज आहे, ते सर्व करू, असे आश्वासन ओपेक व संबंधित उत्पादकांनी दिले आहे. कार्टेलने नुकत्याच दिलेल्या वचनांमध्ये पुढील गोष्टी आहेत. “ ओपेक+ दररोज ७.७ दशलक्ष बॅरलने उत्पादन कमी करेल, १ मे ते १ ऑगस्टपर्यंत उत्पादन कपात दररोज ९.७ दशलक्ष बॅरलपेक्षा कमी झाले. जानेवारी २०२१ मध्ये ओपेक+ आणखी २ दशलक्ष बॅरल प्रतिदिन उत्पादन कमी करेल. तर दुसरीकडे, लिबिया तेलाच्या उत्पादनात मोठी भर घालत आहे. ११ ऑक्टोबर रोजी पुन्हा सुरु झालेल्या शरारा या सर्वात मोठ्या तेल क्षेत्राचे उत्पादन आता दररोज जवळपास १,५०,०००च्या घरात किंवा जवळपास तिच्या निम्म्या क्षमतेत पोहोचले आहे.

ओपेकच्या अतिरिक्त २% उत्पादन वाढीमुळे तसेच लिबियातील तेल उत्पादन पुन्हा सुरु झाल्याने तेल बाजारात गरजेपेक्षा जास्त पुरवठा होईल आणि बाजाराचे संतुलन बिघडेल. या क्षेत्रातील चांगली गोष्ट म्हणजे, मागणीत साथ-पूर्व स्थितीपेक्षा जवळपास ९२% ची सुधारणा झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त पुरवठा बाजाराकडून वापरला जाईल, असे चित्र आहे.

जागतिक अनिश्चितता आणि कोव्हिडचे पुनरुत्थान: कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येची नोंदणी २० ऑक्टोबर रोजी ४० दशलक्ष एवढी होती. युरोप आणि उत्तर अमेरिकेत कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे नव्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. तथापि, अमेरिकेच्या कोरोना विषाणू मदत पॅकेजची आशा धूसर होत असल्याने जगभरातील धोकादायक मालमत्तांना धक्का बसला. युरोपमधील वाढत्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एकाच चलनावरदेखील परिणाम होत आहे.

यासह ब्रिटनचे ब्रेक्झिटवर बोलणी करणारे प्रमुख डेव्हिड फ्रॉस्ट म्हणाले, “ ब्रुसेल्स या चर्चेकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात मूलभूत बदल करणार नाही, तोपर्यंत युरोपियन युनियनशी व्यापार चर्चा पुन्हा सुरु करण्यात काहीही तथ्य नाही. रॉयटर्सच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे सूचवण्यात आले आहे की, बँक ऑफ इंग्लंड पुढील महिन्यात या परिस्थितीशी लढण्यासाठी सर्वतोपरी मदत पुरवण्याचा प्रयत्न करेल. याद्वारे कोरोना विषषाणूमुळे आलेले निर्बंध आणि ब्रेक्झिटवर कोणताही करार न होण्याच्या स्थितीवर काहीशी मात केली जाईल. जपानमध्ये सेंट्रल बँक पुढील आठवड्यातील दर पुनरावलोकनात, वृद्धी आणि चालू आर्थिक वर्षातील किंमतीच्या अंदाजात कपात करणार, अशी अपेक्षा आहे.

तेलाच्या साठ्यात चिनी तेलाचा प्रवाह वाढताच: चीन हा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश असून चीनने सप्टेंबरमध्ये तेल आयातीचे प्रमाण वाढवले आहे. रॉयटर्सच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये क्रूडचा स्ट्रॅटजिक पेट्रोलियम रिझर्व्हमधील ओघ १.७५ दशलक्ष बॅरल प्रति दिन एवढा आहे. या वर्षातील पहिल्या नऊ महिन्यातील सरासरी दररोज १.८३ दशलक्ष या प्रमाणापेक्षा हे काहीसे कमी आहे. तरीही ते २०१९ या वर्षातील ९४०,००० बॅरल प्रतिदिन या प्रमाणापेक्षा जास्त आहे. यातून हे स्पष्ट होते की, चीनची अर्थव्यवस्था कोरोना विषाणूचे केंद्रबिंदू ते तेल बाजारातील सुधारणेचा आशेचा किरण या स्थितीत बदलली आहे.

तेलाचे दराचे पुढे काय होणार?: साथीच्या आजाराने मागणीत अडथळे आले. त्यामुळे तेलबाजारात अतिरिक्त पुरवठा होऊन बाजाराचे संतुलन बिघडले. युरोप आणि उत्तर अमेरिकेत कोव्हिड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या येण्याने तेल बाजारात सुधारणा होण्याची चिंता वाढली आहे. तुलनेत मागणीतील सुधारणा अपेक्षेपेक्षा खूप संथ गतीने होईल.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जगात निराशावाद असून, अमेरिकेकडून नव्या कोरोना मदत निधीचीही चर्चा आहे. ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी त्यांना आर्थिक बाजारासाठी हे बूस्टर मिळेल की, नाही, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मागील दोन महिन्यांपासून तेलाच्या दरात अत्यंत कमी प्रमाणात सुधारणा दिसून आली. तसेच सध्याची बाजाराची गती पाहता, त्यात आणखी सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे, ब्रेंट आणि डब्ल्यूटीआय तेल दर $३५ नंतर $३३ प्रति बॅरलच्या पुढे घसरू शकतात. एमसीएक्सवर तेलाच्या दरात एक महिन्यात २६५० रुपये बॅरल एवढी घट होऊ शकते.