दहिवडीत आमदार जयकुमार गोरे खंदे समर्थक धनाजी जाधव बिनविरोध नगराध्यक्ष

दहिवडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदी धनाजी जाधव यांची निवड झालेनंतर आमदार जयकुमार गोरे, सोनिया गोरे सत्कार करताना अरुण गोरे, अतुल जाधव, सिद्धार्थ गुंडगे आदी मान्यवर.


स्थैर्य, दहिवडी, दि. १० : दहिवडीचे नूतन नगराध्यक्ष म्हणून माजी सरपंच यांची बिनविरोध निवड करण्यात आली नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज उरल्याने पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी आज दुपारी बारा वाजता ही निवड घोषित केली.


निवडीनंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष धनाजी जाधव यांचा सत्कार माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, सोनिया गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, माजी शिक्षण व अर्थ सभापती ऍड. भास्करराव गुंडगे, माजी सभापती अतुल जाधव, युवा नेते सिद्धार्थ गुंडगे, शिवाजी शिंदे, महेंद्र कदम, संजय काशीद, लिंगराज साखरे,  नंदकुमार खोत आदी उपस्थित होते. 


सुरवातीला निवडीच्या बैठकीवेळी माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे, सतीश जाधव,  उपनगराध्यक्षा सुप्रिया शिंदे, माया खताळ, जयश्री कोकरे, नाझीया शेख, वैशाली कदम, नीलम शिंदे, बाळासाहेब गुंडगे, समीर योगे, नलिनी काशीद, अजित पवार, राजाराम इंगवले, महेंद्र जाधव, रवींद्र सकुंडे आदी नगरसेवक उपस्थित होते.


निवड झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. दरम्यान कोविड विषाणूच्या पार्श्वभूमीवर दहिवडी शहरातून काढण्यात येणारी मिरवणूक रद्द करण्यात आली. केवळ छोटेखानी स्वरूपात साधेपणाने शुभेच्छा स्वीकारण्यात आल्या.

 


दहिवडी मध्ये धनाजी जाधव हे आमदार जयकुमार गोरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात तर त्यांनी सन 2010 ते 2015 असे सलग पाच वर्षे सरपंचपद भूषविले होते. आता त्यांना नगराध्यक्ष पद मिळाल्याने सर्वसामान्य जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.


दहिवडी शहराच्या विकासासाठी व सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. तसेच आगामी काळात सर्वसामान्यांसाठी नगरपंचायतीचे दरवाजे खुले राहतील. दहिवडीसह परिसरातील रखडलेली विकासकामे प्रामुख्याने मार्गी लावली जातील. तसेच सर्वसामान्य घटक केंद्रबिंदू मानून आमदार जयकुमार गोरे व शासनाच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्याचे काम केले जाईल. 

धनाजी जाधव- नगराध्यक्ष

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya