अखिल गुरव समाज संघटनेचे सातार्‍यात निदर्शने

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ निदर्शने करताना अखिल गुरव समाज संघटनेचे पदाधिकारी. 

स्थैर्य, सातारा, दि.१: कोरोना प्रादुर्भावामुळे मंदिरे बंद असल्याने राज्यातील गुरव समाजाला अर्थसाह्य करा, यासह अन्य मागण्यांसाठी अखिल गुरव समाज संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ निदर्शने केली. यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे, की राज्यात गुरव समाजाची 30 लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे. हा समाज अत्यंत उपेक्षित व हलाखीचे जीवन जगत आहे त्यात बहुतांश देवाचे पुजारी म्हणून काम करीत असून इनाम वर्ग 3 धारक आहेत. इतरवेळी त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे यापूर्वी या समाजाच्यावतीने तीन वेळा आझाद मैदानावर आंदोलन केली आहे. आंदोलने करून शेकडो निवेदने देऊनही मागण्यांची दखल घेतली जात नाही. करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बहुतांशी मंदिर बंद आहेत. त्यामुळे पुजार्यांवर उपवासाची वेळ आली असल्याने शासनाने राज्यातील गुरव समाजाला अर्थसाह्य करावे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई इनाम वर्ग 3 कसणार्‍याच्या नावाने मिळावी. त्या जमिनीवर पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. इनाम वर्ग 3 जमिनी खालसा करून तसेच बेकायदेशीर हस्तांतरण कुळ काढून मूळ सनदधारकांना देण्यात यावा. परंपरागत पूजाअर्चा व उत्पन्नाचा हक्क कायम ठेवावा. गुरव समाजातील युवक-युवती, महिलांना उद्योग उभारण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहासाठी जागा व निधी उपलब्ध करून द्यावा. सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये गुरव समाजाला 50 टक्के प्रतिनिधीत्व मिळावे. गुरव समाजाच्या संरक्षणासाठी क्ट्रासिटी क्टसारखा कायदा लागू करावा. बेलफुल वाहणार्‍या व वाद्य काम करणार्‍या समाज बांधवांना मदत करावी. 60 वर्ष वयोगटातील पुजार्‍यांना निर्वाह भत्ता द्यावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष शिवाजी साखरे यांची स्वाक्षरी आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya