नायगावजवळ धुमस्टाईलने मंगळसूत्र हिसकावले 


स्थैर्य, खंडाळा, दि.२३: नायगाव-कवठे रोडवर मॉर्निंग वॉकला गेलेल्या विवाहितेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरटयांनी चोरून नेले आहे.

याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, नायगाव ता.खंडाळा येथील शुभदा सुरज नेवसे ह्या पहाटे साडे पाचच्या दरम्यान फिरायला नायगाव-कवठे रोडवर गेल्या होत्या. दरम्यान शुभदा नेवसे ह्यावडगाव पोतनीस गावच्या हद्दीमध्ये आले असता नायगाव बाजूकडून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन चोरटयांनी शुभदा नेवसे यांच्या गळ्यातील सोन्याचे दोन तोळे वजनाचे 40 हजार रुपये किंमतीचे मिनी मंगळसूत्र हिसकावून नेत दुचाकीवरून पलायन केले. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करीत आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya