विद्यापीठाच्या वास्तुविशारद अभ्यास मंडळावर दिनेश जातेगांवकर यांची निवड!

 

स्थैर्य, दि.१३: डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ वास्तुशास्त्र (आर्किटेक्चर) विभाग संबधित अभ्यास मंडळावर (बोर्ड ऑफ स्टडीज)३ वर्षांसाठी नाशिक स्थित वास्तुविशारद प्राध्यापक दिनेश जातेगांवकर यांची निवड केली आहे.

महाराष्ट्रातील ३० नामांकित महाविद्यालय आज DBATU विद्यापीठाशी संलग्न आहेत. 
नवीन शिक्षण प्रणालीत सुचविलेल्या धोरणानुसार बदललेल्या परिस्थितीत वास्तुशास्त्र ह्या अभासक्रमातही मूलभूत बदल होणे गरजेचे ठरणार आहे.

कुलगुरूंनी राज्यातून पाच सदस्यांची निवड अभ्यास मंडळावर केली आहे. त्यात प्राध्यापक आर्कि दिनेश जातेगांवकर हे एक आहे. गेल्या २० वर्षांपासून वास्तुविशारदचे काम सांभाळत ते नाशिक येथील *विद्यावर्धन IDEA* (आयडिया) महाविद्यालयत प्राध्यापक म्हणून कार्यात आहेत.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya