फलटण बाजार समितीचे संचालक बापू करे यांचे निधन 

 

स्थैर्य, फलटण, दि.१७ : फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक बापू हरी करे रा. धुळदेव, ता. फलटण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

मार्केट यार्ड फलटण येथील माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत पुढाकार घेऊन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या कल्पक दृष्टिकोनातून आणि कामगार नेते मा.मानसिंगराव भगत यांच्या विचारांच्या प्रेरणेतून श्रमिकांसाठी श्रमजीवी योजना बापू करे यांनी प्रभावीपणे राबविली. करे यांच्या निधनाने बाजार समितीचे, कष्टकरी कामगारांचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झालेले आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya