जिल्हा कोविड हॉस्पीटल सुरु, 18 रुग्ण दाखल

 


स्थैर्य, सातारा दि.१२: छत्रपती शिवाजी महराज संग्रहालयात उभारण्यात आलेले कोविड हॉस्पीटल आज पासून सुरु झाले असून आज पहिल्या दिवशी 18 रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये 14 रुग्ण ऑक्सीजन बेडवर तर 4 रुग्ण आयसीयु बेड उपचार घेत आहेत.

जिल्ह्याच्या ठिकाणी कोविड हॉस्पीटल असावे अशी सर्वांची इच्छा होती. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांच्या प्रयत्नातून हे जिल्हा कोविड हॉस्पीटलची उभारणी जलदगतीने झाली. या हॉस्पीटलचे उद्घाटन 9 ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. हे हॉस्पीटल आज पासून रुग्णांच्या सेवेसाठी सुरु झाले आहे.
या हॉस्पीटलमध्ये 234 ऑक्सीजन बेड व 52 आयसीयु बेड आहेत. डायलिसीस असणाऱ्या रुग्णांना रुग्णालये घेत नाहीत अशा रुग्णांसाठीही 4 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 

या जिल्हा कोविड हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या उपचाराची माहिती जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी या संस्थेत दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत नातेवाईकांना देण्यात येणार आहे. येणाऱ्या नातेवाईकांसाठी या ठिकाणी तात्पुरते थांबण्याची सोय सुविधा करण्यात आलेली आहे.

Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya