डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात सातार्यात आज निदर्शने करण्यात आली

 

स्थैर्य, सातारा, दि.९: मराठा आरक्षण प्रश्‍नावरून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात सातार्यात आज निदर्शने करण्यात आली. यावेळी डॉ.प्रकाश आंबेडकर यांचा वाचाळवीर असा उल्लेख करत त्यांनी पुन्हा असे बेताल वक्तव्य केले तर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा आक्रमक झालेल्या राजे प्रतिष्ठान व उदयनराजे प्रेमींनी दिला. 

मराठा आरक्षण प्रश्‍नावरून उदयनराजे भोसले यांचा उल्लेख आक्षेपार्ह भाषेत केल्यानंतर आज उदयनराजे प्रेमी आक्रमक झाले. यावेळी प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद, एक नेता एक आवाज उदयन महाराज महाराज, उदयनराजे आगे बढो हम तुम्हारे साथ है, प्रकाश आंबेडकरच कसं काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

आक्रमक झालेल्या उदयनराजे प्रेमींनी निदर्शने केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना, प्रकाश आंबेडकर यांनी सातारमध्ये कधी येणार आहे तुमचे स्वागत आमच्या पद्धतीने करण्यात येईल, असाही इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी बोलताना उदयनराजे प्रेमी म्हणाले की, संपूर्ण जगाचे श्रद्धास्थान असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्याबद्दल वक्तव्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी भान राखायला हवे. प्रकाश आंबेडकर किती विचारवंत आहेत, हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने त्यांनी केलेले वक्तव्य त्यांना लागू पडते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार म्हणून वंचित समाजाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी आजवर जिल्ह्यातील किती वंचित लोकांना न्याय देण्याचे काम केले हे सर्वांना माहीत आहे. याउलट छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कधीही जात-पात,धर्म,पक्ष, गट असा कोणताही भेदभाव न बाळगता त्यांच्याकडे येणार्या प्रत्येक माणसाचे काम मार्गी लावले आहे. प्रकाश आंबेडकर मात्र त्यांच्याकडे जाणार्या प्रत्येक माणसाला या सर्व बाबींची चौकशी करूनच मदत करतात. याउलट खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी खर्या अर्थाने वंचित समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे.
Previous Post Next Post
दैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.
दैनिक स्थैर्य - Daily Sthairya